वेंगुर्लेत ईद निमित्त मुस्लिम बांधवांचा अनोखा उपक्रम…

202
2
Google search engine
Google search engine

पूरग्रस्तांसाठी काढली मदतफेरी…

वेंगुर्ले.ता,१२: कोल्हापूर , सांगली , सातारा या जिल्हात आस्मानी आपत्तीने हजारो कुटुंबियांवर भीषण संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर सध्या उद्भवलेल्या महापुराच्या भीषण आपत्तीत पूरग्रस्तांच्या सहाय्यासाठी वेंगुर्लेतील मुस्लिम बांधवांनी मदतफेरी काढून सामाजिक बांधिलकी जपली.
वेंगुर्ले येथील जमीयातुल मुस्लिमन मसजीत ट्रस्ट च्या कार्यकर्त्यांनी संपुर्ण वेंगुर्ले बाजारपेठेत फिरुन पैसे , धान्य , कपडे,संसारोपयोगी साहित्य जमा केले. या फेरीला मदतीचा हात देत नागरिकांनी उस्फूर्त प्रतीसाद दिला.
भाजपा तालुका कार्यालयातही ही मदत फेरी आली असता. भाजपाच्या वतीने आर्थिक मदत तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांनी दिली.यावेळी कार्यालयात प्रकाश रेगे , दिपक भगत , प्रकाश धावडे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी जमातीया मुस्लिम मसजीत ट्रस्ट चे अध्यक्ष मुस्ताक गोलंदाज यांच्या कडे मदतनीधी देण्यात आला. यावेळी अब्दुल शेख , मेहबूबशहा मकानदार , अब्दुलरहेमान शेख , सीद्धीक गोलंदाज , परवेझ दोस्ती , मुराद शेख , मुनीर मकानदार , उस्मान साठी , ताजुद्दीन मकानदार , बाबाजान मकानदार , अश्रफ मुजावर , सादीक मुल्ला , बाबन नवार , रशीद खलीपे , ठांडगे , सरवर मीर , निहाज मकानदार इत्यादी उपस्थित होते.