चंद्रकांत कासार: पालकमंत्र्यांवर टीका करण्याचा तेलींना नैतिक अधिकार नाही…
सावंतवाडी ता.१२: स्वतःच्या स्वार्थासाठी एका रात्रीत चार पक्ष बदलणाऱ्या राजन तेलींनी आज पर्यंत किती जणांचे संसार उभे केले याचे आत्मचिंतन करावे व नंतरच पालकमंत्र्यांवर टीका करावी,असा टोला शिवसेनेचे कृषी व सहकार उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी आज येथे लगावला,पालक मंत्री दीपक केसरकर आपल्या दौऱ्यात अधिकाऱ्यांना घेऊन फिरतात,त्यामुळे पूरस्थिती संबंधित अधिकाऱ्यांना आपली कामे करता येत नाहीत,असा आरोप तेलींनी केला होता.त्याला प्रत्युत्तर देताना श्री.कासार बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले,राजन तेलींनी स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेचे संसार उध्वस्त करण्याचे काम केले आहे.त्यामुळे ते पूरग्रस्तांचे संसार कसे काय उभे करणार ? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.एवढीच जनतेची आपुलकी असेल तर कणकवली मतदारसंघातील पूरग्रस्तांना पहिल्यांदा आधार द्यावा व नंतरच सावंतवाडी मतदारसंघात ढवळाढवळ करावी असे खडे बोलही यावेळी त्यांनी सुनावले.
सावंतवाडी मतदार संघाचा विकास करण्यासाठी पालकमंत्री श्री.केसरकर व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते समर्थ आहेत.मतदारसंघातील पूरस्थिती लक्षात घेता पूरग्रस्तांच्या भेटी घेऊन त्यांच्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.या भेटीदरम्यान श्री.केसरकर ज्या अधिकाऱ्यांना याबाबतची जाण आहे.अशाच अधिकाऱ्यांना घेऊन फिरतात.त्यामुळे तेलींनी सावंतवाडी मतदारसंघ लढण्याच्या उद्देशाने राजकारण म्हणून पालकमंत्र्यांवर टीका करू नये हे त्यांना शोभत नाही असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा,रश्मी माळवदे,अपर्णा कोठावळे,विश्वास घाग आदी उपस्थित होते.