नारायण राणेंचे स्पष्टीकरण:पक्षाची भूमिका गणपतीपुर्वी जाहीर करणार
सिंधुदुर्गनगरी ता 12
विधानसभा निवडणुकीत कोणती भूमिका घ्यावी याबाबत आमची अन्य पक्षांशी बोलणी सुरू आहेत ते निश्चित झाल्यानंतर गणेश चतुर्थी पूर्वी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची भूमिका जाहीर करण्यात येणार आहे त्याचवेळी उमेदवार जाहीर करण्यात येतील पक्ष हित डोळ्यासमोर ठेवून आपण निवडणूक लढवायची की नाही याबाबतचा निर्णय घेईन असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान चे पक्षाध्यक्ष नारायण राणे यांनी आज येथे केला.यावेळी त्यांनी स्वतः निवडणूक लढविणार का ? असा प्रश्न केला असता पक्ष हिताचा निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी खा राणे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सहा महिन्यानंतर जिल्हा नियोजन सभा लावतात. ती सुद्धा वैयक्तिक कारणाने चार वेळा वेळ बदलतात. तसेच खा विनायक राऊत व आ वैभव नाईक यांच्यावर टिका करताना समुद्र किनारी धुप प्रतिबंधक बंधारा उभारण्यास सीआरझेडची परवानगीची आवश्यकता नाही. आम्ही एवढे बंधारे उभारले. यांनी एकतरी बंधारा उभारावा असे आवाहनही खा राणे यांनी दिले.
यावेळी महाराष्ट्रात उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याची चर्चा सुरु आहे. याबाबत तुमचे मत काय ? असा प्रयत्न खा राणे यांना विचारले असता ‘याबाबत राज्य सरकारने सर्व परिस्थितीचा आढावा घेवून विधानसभा घ्यायची की नाही, याचा निर्णय घ्यावा’ असे सांगितले.