अभिनव फाऊंडेशनतफेँ सावंतवाडी येथे रक्तदान..

2

सावंतवाडी ता.१२: आपले रक्तदान हे दुस-यासाठी जीवनदान ठरते,त्यामुळे जास्तीत-जास्त रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे,असे आवाहन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाँ.यु.बी.पाटील यांनी आज येथे अभिनव फाऊंडेशनच्या रक्तदान शिबीरात केले.

अभिनव ग्रंथालय व अभिनव फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथील रक्तपेढीत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.शिबीराचे उद्घाटन सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै व सामाजिक कायँकतेँ माजी नगरसेवक राजू मसुरकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डाँ.पाटील बोलत होते. कायँक्रम प्रभारी रक्त संक्रमण अधिकारी डाँ.सागर जाधव, अभिनवचे उपाध्यक्ष प्रसाद नावेँकर, खजिनदार जितेंद्र मोरजकर, बाळू वालावलकर, राकेश नेवगी, किशोर चिटणीस, विजय करमळकर उपस्थित होते.
डाँ.पाटील म्हणाले, रक्तदान हे सवँश्रेष्ठ दान आहे. अभिनव फाऊंडेशनसारख्या संस्थांनी केलेल्या रक्तदानामुळे गरजूंना जीवनदान मिळते. त्यासाठी रक्तदात्यांना कोणताही खर्च येत नाही. रक्तदात्यांनी सहकार्य करावे रक्तपेढी चौवीस तास समाधानकारक सेवा देईल.
श्री.मसुरकर म्हणाले, वाढदिवसात आनंदाच्या क्षणी आनंद व्दिगुणीत करण्यासाठी रक्तदानासारखे दुसरे दान नाही. रक्तदानाने कोणताही उपाय होत नाही. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला आवश्यकता असतांना अभिनव फाऊंडेशनने रक्तदान करून स्तुत्य उपक्रम राबविला आहे.
यावेळी अभिनवचे ओंकार तुळसुलकर, डाँ.नावेँकर, हषँल नाडकणीँ, शैलेश नाईक, विनोद वालावलकर, केदार म्हस्कर, अभिषेक देसाई, दुगेँश सबनीस, निरंजन सावंत, कुष्णा राऊळ, सौरभ वारंग, परशुराम चौगुले, आकाश गवळी, अमित परब, गोपाळ गवस, उदय कानविंदे, जतिन भिसे, गौरांग चिटणीस, श्रीनाथ परब आदी अठरा रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबीसाठी टेक्नीशिअन संजय धोंड, उज्वला वाडकर, नसँ मानसी बागेवाडी, अनिल खाडे आदी कमँचारी यांनी परिश्रम घेतले. कायँक्रमाचे प्रास्ताविक व आभार श्री.तुळसुलकर यांनी मानले.

4