माजी खास. राणेंच्यावतीने काळसे बागवाडीतील पूरग्रस्तांना चटई, पाण्याचे वाटप…

216
2
Google search engine
Google search engine
Google search engine

प्रशालेसाठी लवकरच इन्व्हर्टर उपलब्ध करून देणार ; मंदार केणी…

मालवण, ता. १२ : माजी खासदार नीलेश राणे यांच्यावतीने स्वाभीमान पक्षातर्फे आज काळसे बागवाडीतील पूरग्रस्तांना चटई, पाण्याचे वाटप स्वाभीमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी माजी सभापती राजेंद्र परब, काळसे सरपंच केशव सावंत, बाबू कोळगे, रमेश मयेकर, बाळकृष्ण प्रभू, योगेश राऊळ, कमा आजगावकर, दीपक कोरगावकर, अनुष्का हेरेकर, मनीष सातार्डेकर, ग्रामपंचायत सदस्य सुधा कोरगावकर, नागेश खोत, लक्ष्मण माडये, गौरीशंकर नार्वेकर, नारायण सावंत, विलास माडये, माजी सरपंच रश्मी हेरेकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
काळसे बागवाडीतील ग्रामस्थांना चटई, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले. आवश्यकतेनुसार आणखी पाणी उपलब्ध करून दिले जाईल. त्याचबरोबर प्रशालेस देशी, विदेशी मद्यविक्रेते संघटनेच्यावतीने लवकरच इर्न्व्हटर उपलब्ध करून देऊ असे आश्‍वासन श्री. केणी यांनी दिले. गौरीशंकर नार्वेकर यांनी पूरग्रस्तांच्यावतीने माजी खासदार नीलेश राणे व स्वाभीमानच्या पदाधिकार्‍यांचे आभार मानले.

\