बांद्यातील ३१ पूरग्रस्तांना शासनाकडून आर्थिक सहाय्य…

155
2
Google search engine
Google search engine

बांदा ता.१२: शहरातील पुरबाधित चर्मकारवाडी व उभाबाजार येथील ३१ जणांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे एकूण १ लाख ५५ हजार रुपये नुकसान भरपाईचे धनादेश तलाठी फिरोज खान यांच्या हस्ते आज वितरित करण्यात आलेत.मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीची नुकसान भरपाई ५ हजार वरून १० हजार रुपये केल्याने उर्वरीत रक्कम खात्यात थेट जमा करण्यात येणार असल्याचे खान यांनी सांगितले.
आज ईद सण असूनही केवळ माणुसकीच्या नात्याने तलाठी खान यांनी दुपारी सर्वत्र शहरात फिरून धनादेश वितरित केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी बांदा मंडळ अधिकारी आर. वाय. राणे, पंचायत समिती सदस्य शीतल राऊळ आदी उपस्थित होते.