धोकादायक चर सिमेंटऐवजी मातीने बुजवण्याचा आरोप…
आंबोली ता.१२: येथील घाटात रस्त्याला पडलेल्या चरामध्ये सिमेंट घालण्याऐवजी ते धोकादायक चर मातीने बुजविण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडून सुरू असल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज सुरू असलेले काम बंद पाडले.चुकीच्या पद्धतीने ठेकेदाराला काम करू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली तसेच बांधकाम व जिल्हा प्रशासनाच्या विरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली.यावेळी काही झाले तरी निकृष्ट काम होऊ देणार नाही असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला.
यावेळी ग्रामस्थ मायकल डिसोजा,सुनील नार्वेकर,उत्तम नार्वेकर,अमोल करपे,विजय राऊत आदी उपस्थित होते.
अशाप्रकारची लोकांच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकण्याची काम आणि वाहनचालकांच्या जीवाशी खेळ जर बांधकाम विभाग करत असेल तर आम्ही काम होऊ देणार नाही.अशी भूमिका अंबोली ग्रामस्थांनी घेतली आहे.आंबोली ग्रामस्थांच्या मते गणेशोत्सव तोंडावर असताना आंबोली घाट मार्ग मुळीच बंद करता कामा नये,घाट मार्ग चालू ठेवूनच एकेरी वाहतूक सुरू ठेवून घाट रस्त्याची डागडुजी करण्यात यावी,अशी मागणी होत आहे.यापुढे निकृष्ट काम होऊ देणार नसल्याची भूमिकाही अंबोली ग्रामस्थांनी घेतली असून निकृष्ट काम प्रत्येक वेळी बंद पाडले जाईल व वेळकाढू पणा करणाऱ्या ठेकेदारांना अद्दल घडवली जाईल असा स्पष्ट इशारा आंबोली ग्रामस्थांनी दिला आहे.