Tuesday, March 18, 2025
Google search engine
HomeUncategorizedवीज वाहिनी अंगावर पडून म्हैशीचा मृत्यू...

वीज वाहिनी अंगावर पडून म्हैशीचा मृत्यू…

कणकवली, ता.१२: शहरालगतच्या आशिये बाणेवाडी येथे तुटलेल्या विद्युतभारीत वीज तारेचा स्पर्श झाल्याने म्हैस दगावली. सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. यात बाणेवाडीतील दत्तात्रय म्हाडगुत यांचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप आशियेतील ग्रामस्थांनी केला आहे.
बाणेवाडी येथे दत्तात्रय म्हाडगुत यांनी म्हैस चरण्यासाठी सोडली होती. त्यावेळी त्या परिसरात तुटून पडलेल्या वीज तारेचा स्पर्श म्हशीला झाला. यात म्हैस जागीच दगावली. ही बाब समजल्यानंतर म्हाडगूत यांना धक्का बसला. त्यांचा चरितार्थ याच म्हशीचे दूध विकून होत होता. दरम्यान आशिये सरपंच रश्मी बाणे यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला. आशिये गावात यापूर्वीही अनेकवेळा वीज तारा कोसळून जनावरे दगावली आहेत. येथील जीर्ण वीज वाहिन्या बदलण्यात याव्यात अशी मागणी महावितरणकडे केली. परंतु महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सरपंच रश्मी बाणे यांनी केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments