गोकुळाष्टमी निमित्त मेढ्यात विविध कार्यक्रम… १५ ते २५ ऑगस्ट या कालावधीत आयोजन…

2

मालवण, ता. १२ : गोकुळाष्टमीनिमित्त श्रीदेव मुरलीधर मंदिर मेढा येथे १५ ते २५ ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१५ ते १८ ऑगस्ट या कालावधीत जिल्हास्तरीय अभंग गवळण स्पर्धा होणार आहे. यात पाच ते दहा वर्षे, अकरा ते पंधरा वर्षे, सोळा ते वीस वर्षे, वीस वर्षावरील अशा चार गटात ही स्पर्धा होईल. प्रत्येक गटातील विजेत्यांना आकर्षक पारितोषिक दिले जाईल. स्पर्धा रात्री आठ वाजता सुरू होईल. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी आपली नावे श्रीकृष्ण झेरॉक्स सेंटर मुरलीधर मंदिरजवळ चंदू आचरेकर मोबा ९४०४९२४६२९ यांच्याकडे नोंदवावीत.
१९ रोजी पारितोषिक वितरण समारंभ व गायनाचा कार्यक्रम होईल. २० रोजी रात्री आठ वाजता आदर्श संगीत विद्यालय मालवण यांचा गाण्याचा कार्यक्रम होईल. २१ रोजी रात्री आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होईल. २२ रोजी रात्री नऊ वाजता ह.भ.प. विवेक वायंगणकर यांचे सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम होईल. २३ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त रात्री साडे दहा वाजता ह.भ.प. विवेक वायंगणकर यांचे कीर्तन होईल. २४ रोजी दुपारी एक ते तीन वाजता महाप्रसाद, २५ रोजी सायंकाळी चार वाजता दहीहंडी व त्यानंतर बाजारपेठ मार्गे पालखी सोहळा होईल. या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीदेव मुरलीधर मंदिर ट्रस्ट व बालगोपाळ मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

3

4