भिकेकोनाळ येथे वीज वाहीन्या कोसळल्याने दोन रेड्याचा मृत्यू

2

दोडामार्ग.ता,१३:  भिकेकोनाळ येथे आज सकाळी जमिनीवर तूटून पडलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शाने अभय बोर्डेकर यांच्या दोन रेड्यांचा जागिच मृत्यु झाला. या घटनेत बोर्डेकर यांचे १ लाखाचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. विज वितरण विभागाच्या भोंगळ कारभाराचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना याचा त्रास सोसावा लागत असल्याने बोर्डेकर यांनी म्हटले आहे.
आज मंगळवारी सकाळी नेहमी प्रमाणे गुरे चरावयास सोडली होती. मात्र विद्युत विजेच्या तूटून पडलेल्या तारांचा धक्का चरत असलेल्या चार पैकि दोन रेड्यांना बसला त्यावेळी त्यांचा जागिच मृत्यु झाला. यात दोन रेड्यांना वाचविण्यास यश आले. अन्यथा बोर्डेकर यांचे मोठे नुकसान होणार होते.

4

4