महामार्गा नजीक लागवड केलेल्या वृक्षांचा खर्च द्या…

2

…अन्यथा स्वातंत्र्यदिनी आंदोलन; शेतकर्‍यांचा इशारा…

सिंंधुदुर्गनगरी ता.१३: मुंबई गोवा-महामार्गाचे काम सुरू केल्यानंतर महामार्ग रूंदीकरण करताना त्या जागेत असलेली झाडे तोडण्यात आली आहेत.त्यामुळे पर्यावरण संतुलन राखण्याच्या उद्देशाने महामार्गा पासून १ किलो मीटर अंतरापर्यंत ज्या शेतकर्यांच्या जमिनी आहेत.त्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यासाठी शासनाच्या सामाजिक वनिकरण विभागाने सन २०१७-१८ मध्ये १५ कोटी व सन २०१८-१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवडीची खास योजना जाहीर केली.
झाड लावण्यासाठी येणाऱ्या खर्चापोटी प्रत्येकी झाड रू. ५०७ इतके देण्याचे जाहीर करण्यात आले पर्यावरण संतुलन राखण्यासाठी शासनाने जाहीर केलेली योजना आश्वासक वाटल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पदरमोड करून स्व खर्चाने वृक्षलागवड केली सन 2017/18 व 2018/19 मध्ये जिल्ह्यातील महामार्ग लगत च्या शेतकऱ्यांनी या योजनेनंतर्गत वृक्ष लागवड केली परंतू अद्द्यापपर्यंत या योजनेन्तर्गत ठरवून दिलेल्या दराप्रमाणे जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यावर सन 2017/18 व 2018/19 ची रक्कम अद्द्यापपर्यंत जमा करण्यात आलेली नाही.याबाबत कार्यालयात वेळोवेळी चौकशी केली असता ठोस असे उत्तर मिळू शकत नाही.
तरी ज्या शेतकऱ्यांनी या योजनेतून वृक्ष लागवड केली त्या शिक्षकांच्या बँक खात्यावर दि. 14 आॅगस्टपर्यंत रक्कम जमा न झाल्यास दि. 15 आॅगस्ट2019 रोजी शेतकर्यांचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 9. 30 ते 5. 30 पर्यंत उपोषण करणार आहेत.सदर शेतकरी प्रतिनिधी वयोवृद्ध ज्येष्ठ नागरीक असल्यामुळे त्यांच्या आरोग्यास बाधा पोहोचल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही देण्यात आला आहे.
सदर निवेदन प्रविण दुर्गराम नाईक,नारायण भगवान गावडे,गजानन गोविंद तळेकर ,विश्वनाथ शिवराम परब,मधुकर राघोबा राणे,
कृष्णा गोविंद वारंग यांनी दिले आहे.
तसेच या योजनेत लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी सदर आंदोलनास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

9

4