दोडामार्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात…

2

मोफत वैद्यकीय तपासणी करून केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

दोडामार्ग/तन्मय नाईक ता.१३: तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व खाजगी डॉक्टर्स यांच्या माध्यमातून कोनाळ,घोटगेवाडी,वायंगतड येथील पूरग्रस्तांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले.तसेच यावेळी अन्नधान्य व बेडशीट-चादरचे वाटप करण्यात आले.दरम्यान यावेळी सर्व डॉक्टर्स मदत कार्यास गेल्याने ग्रामीण रुग्णालयातील प्रतिनियुक्ती डॉ.सचिन खतखल्ले यांनी आरोग्य सेवा देत मोलाची साथ दिली.
तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन अनेकांचे संसार पाण्याखाली गेले होते.हे संसार पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी सर्वच स्तरावरून मदतीचे हात पुढे सरसावत आहेत.दरम्यान अशा पूरजन्य परिस्थितीत ठीक-ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.तर परिसरातील पाणी साठे सुद्धा दूषित झाले आहेत.त्यामुळे या भागात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.त्यादृष्टीने खबरदारी घेत येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोफत तपासणी स्वरूपात पुरग्रस्तांना मदत केली व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाँ.ज्ञानेश्वर ऐवळे, डाँ.महेश पवार. डाँ.उमेश देसाई, डाँ.कुष्णा कविटकर, डाँ.सौ.मनाली पवार, डाँ.नंदकुमार दळवी, डाँ.संदेश नांदोडकर, डाँ.समीर गवस, डाँ.रामदास रेडकर तसेच रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ परशुराम नाटेकर, अभिचारिका सौ.सावंत, सौ.देसाई, सौ.भणगे, समुपदेशक दिपक गोरे, अर्थव ऐवळे, श्री.तिवारी आदी उपस्थित होते.

24

4