वेंगुर्लेत ख्रिस्ती बांधवांकडून पुरग्रस्तांना मदत

2

वेंगुर्ले.ता,१३: वेंगुर्ला येथील ख्रिस्ती बांधवांकडून पूरग्रस्त कोल्हापूर, सांगली, सातारा भागातील लोकांना धान्य तसेच कपडे स्वरूपात मदत करण्याकरिता एक गाडी जीवनावश्यक समान देण्यात आले. चर्चचे फादर अँथोनी डिसोझा यांनी देण्यात येणाऱ्या वस्तूवर आशीर्वादीत केले व पूरग्रस्त लोकांचे लवकरात लवकर कष्ठ मिठून त्यांचे संसार पुन्हा उभे रहावे व त्यांची प्रकृती ठीक व्हावी यासाठी प्रार्थना केली.

यावेळी त्याठिकाणी सामाजिक कार्यकर्ते कार्मिस आल्मेडा, जेनिफर डिसोझा, लुईस फर्नांडिस, मॅक्सी फर्नांडिस, आंतोन आल्मेडा व सिस्टर उपस्थित होते. सर्व सामान आज १३ ऑगस्ट रोजी वेंगुर्ले-शिरोडा नाका येथून रवाना करण्यात आले.

1

4