भाजप तर्फे वेंगुर्लेत अटल स्मृतीनिमित्त १६ रोजी विविध कार्यक्रम

2

वेंगुर्ले.ता,१३: माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त वेंगुर्ला भाजपाच्यावतीने १६ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

१६ ऑगस्ट रोजी ११ वा. पिराचा दर्गा येथील तालुका कार्यालयात ज्येष्ठ नागरीकांसाठी छत्री वाटप तर सायंकाळी ४ वा. साई मंगल कार्यालयात सातेरी प्रासादिक संघ संचलित आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे अटलजींच्या कवितांच्या वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. राष्ट्रभक्तीची प्रखर भावना जागविणाच्या अनेक कविता अटलजींनी लिहिल्या आहेत. त्या कवितांचे सादरीकरण या श्रद्धांजली कार्यक्रमामध्ये होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी केले आहे.

4