असनिये व झोळंबे येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
बांदा.ता,१३: डोंगर कोसळल्याने स्थलांतरित केलेल्या २७ कुटुंबाना व झोळंबे-दापटेवाडी येथील आपद्ग्रस्थाना बांदा मराठा समाज कडुन मदतीचा हात देण्यात आला. गेल्या चार दिवसांत दोन वेळा जीवनावश्यक वस्तू, कडधान्ये, लहान मुलांसाठी खाऊचे वाटप करण्यात आले.
दरड कोसळल्याने त्याखाली असणाऱ्या कणेवाडीतील २७ कुटुंबातील १०० लोकांना असनिये प्राथमिक शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. या आपदग्रस्थाना मदतीची गरज असल्याची माहिती मिळताच बांदा मराठा समाजाने दोन वेळा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच झोंळबे-दापटेवाडी येथील स्थानिकांना देखील मदत करण्यात आली. यामध्ये चार दिवसांसाठी लागणारा भाजीपाला, कडधान्ये, रोजच्या वापरातील वस्तू व बिस्कीटे मदतीच्या स्वरूपात देण्यात आल्या.
यावेळी मराठा समाज अध्यक्ष राजराम सावंत-मोर्ये, सचिव महादेव सावंत, महिला मराठा समाज अध्यक्ष अवंती पंडीत, सचिव लक्ष्मी सावंत, ममता सावंत, अरुणा सावंत, लक्ष्मी गोविंद सावंत, ज्ञानेश्वर सावंत, गुरुनाथ सावंत, बाबा गाड, विकी कदम, बांदा ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरस्कर, आनंद मोर्ये, खजिनदार राकेश परब, जय भोसले, पाडलोस कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य समीर कोलते आदी उपस्थित होते.