Thursday, December 12, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यानैसर्गिक आपत्ती नुकसानीबाबत खा राणे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

नैसर्गिक आपत्ती नुकसानीबाबत खा राणे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

सिंधुदुर्गनगरी.ता,१३: जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे शेतकरी, उद्योजक व्यापारी आदी सर्वच नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेत चर्चा केली. शेतकऱ्याच्या भातशेतीचे तसेच ऊस शेतीसह अन्य पिकांच्या नुकसानीचे वेळेत सर्व्हे पूर्ण करा, बाधित नागरिकांना मिळणारी शासकीय मदत तातडीने पोहच करा आणि जिल्ह्यातील रस्ते, विद्युत पुरवठा, पिण्याचे पाणी या सुविधा तात्काळ सुरळीत करण्यासाठी आपण दक्षता घ्यावी अशी मागणी खासदार नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावेळी आमदार नितेश राणे व जिप अध्यक्षा संजना सावंत उपस्थित होते.
स्वाभिमान पक्षाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या या शिष्टमंडळाने जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. यावेळी स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जीपचे उपाध्यक्ष रणजीत देसाई, मनीष दळवी, अशोक सावंत आदी पदाधिकारीही या शिष्टमंडळात उपस्थित होते.
जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे काही गावातील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे त्यामुळे साथीचे आजार उद्भवू नये म्हणून दक्षता घ्यावी. काळसे बागवाडी येथे पुराच्या पाण्यामुळेलप विहिरीत चिखल सदृश्य पाणी गेले आहे अशासारख्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये डोंगर खचून धोका निर्माण झाला आहे त्याकडेही लक्ष द्यावे. या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे अशा गावांना वीज वितरण कंपनीचे कर्मचारी बाळ देऊन तेथील विद्युत पुरवठा शेतीपंप व पाणीपुरवठा यंत्रणांचे पंप तात्काळ दुरुस्त होतील. याबाबत सूचना द्याव्यात. अशा मागण्यांकडेही या शिष्टमंडळाने लक्ष वेधले.
या पुरामुळे जिल्ह्यातील भातशेती धोक्यात आली आहे तसेच ऊस शेतीची ही मोठी हानी झाली आहे शेतकऱ्यांच्या अन्य पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे या सर्वेक्षणाचे पंचनामे वेळेत पूर्ण करावेत व नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडून मिळण्यासाठी पाठपुरावा करावा तसेच जिल्ह्यातील सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले असून अनेक मार्गांची खड्डे पडून बिकट अवस्था झाली आहे काही पूल आणि साकव ही नादुरुस्त झाले आहेत त्यामुळे काही गावातील नागरिकांची वाहतूक सुविधेसाठी गैरसोय निर्माण झाली आहे. अशा रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय दूर करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

जिल्ह्यातील पूरग्रस्त बाधितांना शासकीय मदत मिळणे हा नागरिकांचा अधिकार आहे. शासन निर्णयाच्या आधारे तातडीने ही मदत देण्याची जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे. ही मदत देण्यासाठी पालकमंत्र्यांच्या आदेशाची गरज नसते. जिल्हाधिकाऱ्यांकडे यासाठी उपलब्ध निधी असतो त्यातून पूर बाधितांना ही मदत तातडीने उपलब्ध करून दिले जाते अशी प्रतिक्रिया पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना खासदार नारायण राणे यांनी दिली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्ह्याला दोन कोटी पालकमंत्र्यांनी दिले आहेत या पत्रकारांच्या माहितीवर उत्तर देताना ते म्हणाले पालकमंत्र्यांनी आपल्या खिशातून २ कोटी दिले नाहीत. आपत्कालीन परिस्थितीत पूरबाधित नागरिकांना जुन्या शासन निर्णयाच्या आधारे तातडीची ही मदत जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांपर्यंत पोहोच करावायचे असते असेही नारायण राणे यांनी स्पष्ट केले

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments