वेंगुर्ले.ता,१३: तालुक्यातील तुळस येथील नागरिकांनी एकत्र येत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच कोल्हापूर, सांगली याठिकाच्या पुरग्रस्त लोकांसाठी जमा केलेले साहित्य युवासिंधू फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्याकडे सुपूर्द केले. युवासिंधू फाउंडेशन मार्फत हे साहित्य जिल्ह्यातील आवश्यकत्या तसेच कोल्हापूर, सांगली, नरसोबाचीवाडी आधी ठिकाणी फाउंडेशन चे सदस्य स्वतः जाऊन वाटप करणार आहेत.
महाराष्ट्रात गेले काही दिवस पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे विविध जिल्ह्यांत हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील पूरग्रस्त लोकांसाठी हातभार म्हणून जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील युवकांनी एकत्र येऊन युवासिंधू फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातुन विविध जीवनावश्यक वस्तू गोळा केल्या जात आहेत. यामध्ये चांगले कपडे, ब्लँकेट, चादर, सॅनिटरी नॅपकिन, प्रथमोपचार पेटी, कडधान्य, बिस्किटे, मिनरल वॉटर, तेल, कांदे, बटाटे, तांदूळ, मीठ, साखर, खाद्यपदार्थ अशा विविध प्रकारची मदत रूपी सेवा स्वीकारली जात आहे. याच उपक्रमा अंतर्गत आज येथील तुळस ग्रामस्थ, तळवडे मुरारवाडी ग्रामस्थ व वेंगुर्ला येथील काही ग्रामस्थांनी ह्या वस्तू एकत्र करून युवासिंधु फाउंडेशन च्या सदस्यांकडे सुपूर्द केल्या. दरम्यान अजूनही हा उपक्रम सुरू असून पुढील दोन दिवसांत नागरिकांनी सर्वतोपरी मदत करावी असे आवाहन फाउंडेशन मार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सागर नाणोसकर (९४२३३०९१६६), ओंकार सावंत (८५५४०४५६९३), दीपेश परब (७७७४९०५०३६) यांच्याशी संपर्क साधावा.