जिल्ह्यातील पूरग्रस्तांना तात्काळ मदत द्या…

2

काँग्रेसच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…

सिंधुदुर्गनगरी ता.१३:  जिल्ह्यात महापुरामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना योग्य ती मदत देण्यात यावी,या मागणीसाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली.यावेळी नुकसानी झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे व्हावे,यात घरे,शेत,पंप आदी वस्तूंच्या पंचनाम्यांचा समावेश करून संबंधित नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी.अशी मागणी यावेळी करण्यात आली.तसेच पूर परिस्थिती लक्षात घेता साथीच्या रोगांपासून पूरग्रस्तांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही,त्यामुळे त्यांना आवश्यक असलेली आरोग्य सेवा देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी माजी आमदार पुष्पसेन सावंत,काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे आदी उपस्थित होते.दरम्यान श्री.पांढरपट्टे यांची भेट घेत त्यांनी चर्चा केली,यावेळी जिल्हाधिकारी यांनी आपल्या सर्व मागण्या रास्त असुन यावर योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर केली जाईल तसेच शासकीय मदत, नुकसान भरपाई ,पंचनामे, रस्त्यांचे प्रश्न,भविष्यात उद्भवू शकणारे रोग याबाबत संबधित विभागांना सुचना देऊन त्यावर त्वरीत कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश जैतापकर, डाॅ. जयेंद्र परुळेकर, प्रांतिक सदस्य इरशाद शेख, ओबीसी जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ डोंगरे, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष तथा प्रांतिक सदस्य काका कुडाळकर, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सर्फराज नाईक, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष दादा परब, कुडाळ तालुका अध्यक्ष आबा मुंज, विजय प्रभू, सावंतवाडी तालुका अध्यक्ष बाब्या म्हापसेकर, दोडामार्ग तालुका अध्यक्ष बाळा धाऊसकर, प्रांतिक सदस्य बाळा गावडे, वेंगुर्ला नगरसेवक प्रकाश डिचोलकर, विधाता सावंत, आत्माराम सोकटे, नगरसेविका कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, सावंतवाडी युवक अध्यक्ष महेन्द्र सांगेलकर, राघवेंद्र नार्वेकर, चंद्रकांत राणे आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2

4