सिंधुदुर्गनगरी ता.१३:आवाज संगीत विद्यालय येथे ‘चतुर्थीचे वाजपी, हा एक आगळा वेगळा उपक्रम मुंबई येथे पार पडला.कुडाळ येथील पखवाज अलंकार हेमंत तवटे यांनी उपस्थितीतांना गणेश चतुर्थीच्या आरत्या कशा वाजवायच्या याच चार तासाचे मुद्देसूद प्रशिक्षण दिले गेले.
गणेश चतुर्थीचा सण अगदी काही दिवसांवर येवून ठेपला आहे. कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भजन, आरत्या यामुळे या दिवसातील वातावरण भक्तीमय होऊन जाते. गणेश चतुर्थीच्या आरत्या पखवाजावर कशा वाजवायच्या याचे प्रशिक्षण ठेवण्यात आले होते. चार तासात पखवाज वादनाचे मुलभूत बोल शिकून आरती वाजवण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या प्रशिक्षणात तरूणांसोबत कोकणातून मुलींचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता. ये आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे भजन क्षेत्रातील नामांकित बुवा भगवान लोकरे, प्रमोद हरयाण, प्रमोद धुरी, पखवाज वादक माऊली सावंत यांनी कौतुक केले आहे.