आनंद नेवगी:आमच्या नेत्यांवर टीका झाल्यास अंडीपिल्ली बाहेर काढू…
सावंतवाडी ता.१३: शिवसेनेचे स्वयंघोषीत कृषी आणि सहकार जिल्हाप्रमुख असलेले चंद्रकांत कासार हे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे पगारी नोकर आहेत.त्यामुळे त्यांना थेट माजी आमदार राजन तेली यांच्यावर टीका करणे शोभत नाही.असा प्रतिटोला भाजपाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद नेवगी यांनी आज येथे लगावला.रात्री चार पक्ष बदलण्याचा आरोप करणाऱ्या कासार व त्यांच्या पालकमंत्र्यांनी आपण पक्ष बदलला नाही का याचे उत्तर जनतेला द्यावे,नाहक आमच्या नेत्यावर टीका करू नये,अन्यथा कासार यांची अंडी पिल्ली बाहेर काढून असेही यावेळी बोलताना श्री.नेवगी यांनी सांगितले.
काल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत कासार यांनी माजी आमदार तेली यांच्यावर टीका केली होती.यात एका रात्रीत चार पक्ष बदलणाऱ्या तेलींनी किती जणांचे संसार उभे केले ? असे म्हटले होते.याला श्री.नेवगी यांनी प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले,तेलींनी पाठबळ दिल्यामुळे कासार उपसभापती म्हणून बसले होते. हे ते आता विसरले आहेत.त्यांना आमच्या नेत्यावर टीका करण्याचा अधिकार नाही.आज ते कोणत्या पक्षात आहेत, आणि कोणाचा पगारी नोकर म्हणून काम करत आहेत,याचा त्यांनी अभ्यास करावा.माजगाव उद्यमनगर मध्ये युनियन स्थापन त्यांनी करून किती जणांचा रोजगार हिरावला याचे उत्तर जनतेला द्यावे.पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह त्यांनी पक्ष बदलला नाही का? असा प्रश्न यावेळी नेवगी यांनी केला.
आमचा नेता सर्वसमावेशक आहे पूरग्रस्त भागात त्यांनी पाहणी केली लोकांची मते जाणून घेतली,अशा परिस्थितीत तुमच्या नेत्याकडून आश्वासनापलीकडे
काय केले याचे उत्तर कासार यांनी द्यावे. तीनपाट माणसांनी केलेल्या टीकेला आम्ही उत्तर देणार नाही असा इशारा नेवगी यांनी दिला
यावेळी शहराध्यक्ष प्रसाद अरविंदेकर विभागीय अध्यक्ष अजय सावंत, भाजपा युवा मोर्चाचे निशांत तोरस्कर आदी उपस्थित होते.