राजकीय दुकाने चालू राहण्यासाठी तेली,उपरकरांची पालकमंत्र्यांवर टीका…

181
2
Google search engine
Google search engine
Google search engine

रूपेश राऊळ:आधी आपल्या गावात निवडून येवून दाखवा…

सावंतवाडी ता.१३:  स्वतःची राजकीय दुकाने चालू ठेवण्यासाठी माजी आमदार परशुराम उपरकर व राजन तेली हे दोघेही पालकमंत्री दीपक केसरकर यांना टार्गेट करत आहेत.आमच्या नेत्यावर टीका करण्यापेक्षा दोघांनी आपल्या गावात निवडून येऊन दाखवावे आणि नंतरच बोलावे.त्यांची ही केविलवाणी धडपड शिवसेना कदापि सहन करून घेणार नाही,असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
येथील पालकमंत्री केसरकर यांच्या निवासस्थानी श्री.राऊळ यांनी पत्रकार परिषद घेत राजन तेली व परशुराम उपरकर यांच्यावर टीकास्त्र सोडले,यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत,अशोक दळवी,चंद्रकांत कासार,बाळू माळकर,नारायण राणे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.राऊळ म्हणाले,आपत्तकालिन परिस्थितीत पालकमंत्री या नात्याने केसरकर हे लोकांनपर्यत पोहचले,त्यांनी आर्थिक मदतही केली.मात्र लोकांचे अश्रू पुसण्यापेक्षा राजन तेली व परशुराम उपरकर हे केसरकरांवर टिका करतांना दिसुन येत आहेत.या दोघांना जनतेच्या ह्रदयामध्ये स्थान निर्माण करणे कधीच जमणार नाही,मागच्या दरवाज्यातून आमदार झालेल्यांनी केसरकरांना मदत कशी करावी हे शिकवू नये.
ते म्हणाले, केसरकरासारखे जनतेमध्ये काम करणारे पालकमंत्री यापूर्वी झाले नाहीत.त्यामुळे काम करणार्या मंत्र्यावर अशी टिका होणे चुकीचे आहे,येथील जनता सुज्ञ असून ते योग्य वेळी यांना जागा दाखवून देईल असे त्यांनी सांगितले..स्वतःचे राजकीय दुकान सुरु राहावे यासाठी दोघांची तळमळ असुन एकेकाळी राणेंचे डावे उजवे असणारे हे दोघे येणार्या काळात पुन्हा राणे यांची तळी उचतात का असा प्रश्नही जनतेतून उपस्थित होत आहे .असेही ते म्हणाले.

\