असलदे धनगरवाडी येथे आढळला अज्ञाताचा मृतदेह

2

पुरातून वाहून आल्याची शक्यता

कणकवली, ता.13 ः तालुक्यातील असलदे धनगरवाडी येथे अज्ञाताचा मृतदेह आढळून आला असून पियाळी नदीला आलेल्या पूरामुळे येथील भागात साचलेल्या पाण्यातून वाहून आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. असलदे धनगरवाडी नजीक अज्ञाताचा मृतदेह पियाळी नदीनजीकच्या बागेच्या बाजूला शेतकरी उत्तम नरे यांना आज दिसून आला. त्यांनी तातडीने असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, पोलिस पाटील सावित्री पाताडे याच्याशी संपर्क साधत याबाबतची माहिती दिली. यानंतर घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक अंबाजी भोसले, पोलिस हवालदार श्री. सावंत, श्री.खाडे, श्री.कांबळे धाव घेत पंचनामा करत पुढील कार्यवाही केली.

1

4