अक्रम खान; स्वातंत्र्यदिनी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा…
बांदा ता.१३: बांदा-दोडामार्ग रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांनी देऊन महिनाभराचा कालावधी लोटला आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून भले मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याची गणेश चतुर्थीपूर्वी डागडुजी करावी या मागणीसाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी तथा बांदा उपसरपंच अक्रम खान हे स्वातंत्र्यदिनी लाक्षणिक उपोषण छेडणार आहेत.याबाबतचे निवेदन त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व सावंतवाडी प्रांताधिकारी यांना दिले आहे. त्यांच्या या उपोषणाला शेकडो वाहनचालकांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.