अनाथ महिलेवर वेंगुर्ले पालिकेच्या पुढाकाराने अंत्यसंस्कार

2

वेंगुर्ले ता.१३:
वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील महानंदा पारकर या निराधार महिलेवर नगरपरिषदेच्या पुढाकाराने अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रीम. महानंदा जगन्नाथ पारकर वय ५८ वर्ष ही महिला बरेच वर्ष वेंगुर्ला शहरात घरकाम करुन उदरनिर्वाह करीत होती. या महिलेचे वास्तव्य भटवाडी येथील भाड्याच्या खोलीत होते. तिचे आकस्मिक निधन झाल्याची वार्ता येथील स्थानिक रहिवाशी अशोक ठोंबरे व प्रितम सावंत यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी सदर घटनेची आकस्मिक मृत्यु अशी नोंद करुन या महिलेचे अंत्यसंस्कार नगरपरिषदेमार्फत करण्याच्या सूचना दिल्या.
वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप व मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी तात्काळ पुढाकार घेवून तांबळेश्वर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले. यावेळी स्थानिक नगरसेवक प्रशांत आपटे, साक्षी पेडणेकर तसेच स्थानिक रहिवाशी रविंद्र शिरसाट, चंद्रकांत सातार्डेकर, नवनाथ सातार्डेकर, गोटू तावडे उपस्थित होते. याकामी नगरपरिषद कर्मचारी श्री. जयेंद्र चौधरी, श्री. कैलास वेंगुर्लेकर, हेमंत चव्हाण व अनिल वेंगुर्लेकर यांचे सहकार्य लाभले. या कार्याबद्दल शहरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

16

4