वाहून गेलेल्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी टेंडर न काढता कामे करणार

2

दीपक केसरकर :मंत्रिमंडळाच्या बैठकीत  सिंधुदुर्गच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय

 

मुंबई ता 13
अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता टेंडर काढण्याऐवजी ही कामे कंत्राटदाराकडून किंवा मजूर सोसायटीच्या माध्यमातून लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्न केले जावीत असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला .त्यामुळे पूर्व परिस्थितीमुळे तुटलेले घाट रस्ते ,गावातील रस्ते लवकरात लवकर पूर्व होण्यासाठी मदत होईल असा दावा पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केला.
आज मुंबई येथे पूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली या बैठकीत काही सकारात्मक निर्णय घेण्यात आला याबाबतची माहिती पालकमंत्री केसरकर यांनी दिली
यात कोकणातील मातीची घरे व कौलांची घरे पावसाळ्यात भिजल्यानंतर सात ते आठ दिवसानंतर विरघळून जाण्याची शक्यता असते त्यामुळे या घरांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्यात यावी किनारपट्टीवर असलेल्या लोकांची जनावरे समुद्रात वाहून जातात त्यामुळे त्या जनावरांचे शव विच्छेदनासाठी मिळत नाहीत परिणामी संबंधिताला नुकसान भरपाई मिळू शकत नाही त्यामुळे पोलिस पाटील सरपंच आदी लोकांच्या उपस्थितीत पंचनामा करून नुकसानभरपाई देण्यात यावी. कोकणातील अर्थव्यवस्था फळबागायती अवलंबून आहे परंतु फळ बागायतीचे किंवा झाडांचे नुकसान मिळत नाही त्यामुळे झाडांची नुकसानी सुद्धा देण्याबाबत योग्य ते प्रयत्न व्हावे असे विविध निर्णय यावेळी घेण्यात

1

4