मडूरेत मगरीच्या हल्ल्यात बैल जखमी

661
2

बांदा ता.१३:
मडूरे – रेडकरवाडी येथील शेतकरी मदन कृष्णा परब यांच्या बैलावर मगरीने हल्ला करून जखमी केले आहे. या हल्ल्यात बैलाचा डावा पाय पुर्णपणे निकामी झाला आहे. धोंडमळा येथील ओहोळात याच ठिकाणी मगरीने १४ गुरांना यापुर्वी जखमी केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. वारंवार हल्ले होऊनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याबद्दल वनविभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यामध्ये ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
आजगाव वनपाल सी. व्ही. धुरी यांनी पंचनामा केला. यावेळी वनरक्षक राठोड व वनमजूर चंद्रकांत पडते उपस्थित होते.

4