आचरा, ता. १३ : अतिवृष्टीमुळे भात नाचणी पिकांबरोबरच कोकणातील नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे भुईमूग पीक धोक्यात आले आहे. बहुतांशी ठिकाणी दुबार पेरणी करूनही बियाणे कुजून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पळसंब येथील सुमारे आठ एकर क्षेत्रावरील अंदाजे ४६ शेतकऱ्यांचे बियाणे कुजल्याने मोठे नुकसान झाले आहे. याबाबत सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी पहाणी करून नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी कृषी विभागाकडे केली आहे.
आचरा परीसरात मुख्य भात शेतीबरोबरच शेतकऱ्यांना आर्थिक फायदा देणारे पिक म्हणून भुईमूग शेती ओळखली जाते. मधल्या काळात पावसाने उसंत घेतल्याने घाईगडबडीत या भागातील शेतकऱ्यांनी भुईमूग लागवड केली. मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने जोर धरल्याने शेतात पेरलेले भुईमूग बियाणे कुजून गेले. आचरे गावात काही शेतकऱ्यांनी उघडीप मिळताच पुन्हा भुईमूग लागवड केली. पण मुसळधार पावसामुळे त्यांचे प्रयत्न फोल ठरले. काही ठिकाणी तुरळक बियाणे रूजून आले तर काही ठिकाणी रूजत घातलेले संपूर्ण बियाणेच कुजून गेल्याने शेतकऱ्यांचे हजारोंचे नुकसान झाले आहे. याबाबत पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी पळसंब गावातील भुईमूग शेतीची पाहणी केली. पळसंब येथील जवळपास आठ एकर क्षेत्रावरील सुमारे ४६ शेतकऱ्यांचे प्रत्येकी तीन ते चार हजारांचे नुकसान झाले असून शासनाने नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
नाचणीची रोपे लागवडी योग्य झाली असून मुसळधार पावसाने लागवड करायलाच मिळत नसल्याने नाचणी पिकही धोक्यात आल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. सोमवार, मंगळवारी पावसाने थोडी उसंत घेतल्याने आचरा परीसरात नाचणी लागवडीसाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती.
अतिवृष्टीमुळे भात, नाचणी पिकांबरोबर भुईमूग पीकही धोक्यात… नुकसानीचा पंचनामा करण्याची कृषी विभागाकडे मागणी ; सरपंच चंद्रकांत गोलतकर…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES