जयवंत दळवी यांच्या जयंती निमित्त आरवली येथे १४ ऑगस्टला विविध कार्यक्रम

2

वेंगुर्ले : ता.१३
थोर साहित्यिक कै.जयवंत दळवी यांच्या जयंती निमित्त जीवन शिक्षण शाळा आरवली नं.१ येथे १४ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रारंभी जीवन शाळेच्या विद्यार्थ्यांचे मनोगत त्यानंतर श्रद्धा गवंडी ,गोवा यांचे ‘ संध्याछाया’ नाटकातील प्रसंगाचे सादरीकरण. ते झाल्यावर चैतन्य दळवी,वेंगुर्ला यांचा कथा कथन कार्यक्रम व शेवटी प्रमुख वक्ते गोवा येथील प्रा. अनिल सामंत हे साहित्य विचार मांडणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला जरूर यावे असे आवाहन जयवंत दळवी प्रेमी आणि साहित्य प्रेरणा कट्टा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

0

4