वीज वाहिन्यांचा शॉक लागल्यामुळे दोडामार्ग मणेरी मध्ये दाम्पत्याचा मृत्यू

2

दोडामार्ग/शिवम पांचाळ
वीज वाहिन्या अंगावर कोसळल्याने मणेरी येथे राहणा-या दाम्पत्यांचा मृत्यू झाला.
ही घटना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांना अधिक उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु तत्पूर्वीच ते मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने घोषित केले.
शोभा नाईक, गुरूनाथ नाईक अशी दोघांची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की मणेरी येथील गुरु नाईक यांच्या अंगणात असलेल्या कुत्र्याचा अचानक मृत्यू झाला.दरम्यान त्या कुत्र्याला पाहण्यासाठी नाईक आपल्या अंगणात गेले,यावेळी त्या ठिकाणी वीज पुरवठा सुरू असलेली वीज वाहिनी कोसळली होती.त्याचा अंदाज न आल्याने त्यांना शॉक लागला.अचानक आपले पती आरडाओरड करीत असल्याचे पाहून त्याठिकाणी शोभा नाईक गेल्या परंतु त्यांनाही विजेचा शॉक लागला.यात दोघांचा मृत्यू झाला.दरम्यान त्यांना अधिक उपचारासाठी दोडामार्ग प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.परंतु तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकांनी गर्दी केली होती.तसेच यावेळी विज अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार नाराजी व्यक्त करण्यात आली.

2

4