अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा मनसेचे संतोष भैरवकर यांचा आरोप…
ओटवणे ता.१४: येथील बीएसएनएलचे दुरध्वनी केद्रांचे कार्यालय कोसळले.ही घटना रात्री घडली.गेल्या चार-पाच दिवसात झालेल्या पावसानंतर मातीची असलेली इमारत कोसळली.यात सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही. मात्र यंत्रणा खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे.
याबाबतची माहिती मनसेचे कार्यकर्ते संतोष भैरवकर यांनी दिली.लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून इमारतीची डागडुजी करण्यात यावी,अशी मागणी आपण बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांकडे यापूर्वी केली होती.परंतु दुर्दैवाने संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात आले.त्यामुळे हा प्रकार घडला.असा आरोप भैरवकर यांनी केला.दरम्यान यंत्रणा खराब झाल्यास त्याची नुकसान भरपाई संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.