अणसुर-वरचीभाट येथे धुपप्रतिबंधक बंधारा नसल्याने खारे पाणी घुसले बागायती व शेतीमध्ये

179
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सुमारे ५० हजारांचे नुकसान : बंधारा बांधण्याची मागणी

वेंगुर्ले : ता.१४
तालुक्यातील अणसुर-वरचीभाट खाडी किनारी मंजुर असलेल्या दोन किलोमिटर धुपप्रतिबंधक बंधाऱ्यापैकी एक किलो मिटर बंधारा बांधला गेला नसल्याने खाडीतील खारे पाणी नुकत्याच झालेल्या मोठ्या पावसात बागायती व शेतीमध्ये घुसुन ग्रामस्थांचे सुमारे ५० हजार पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. हि परिस्थिती अशीच राहिल्याल ही जमिन नापिक होऊन मोठे नुकसान होणार आहे. पालकमंत्र्यांनी या परिस्थितीची पहाणी करुन खारलँड विभागामार्फत हा धुपप्रतिबंधक बंधारा होण्यासाठी आतातरी प्रयत्न करावेत अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने बागायतदार आनंद उर्फ बीटु गावडे यांनी केली आहे.
तालुक्यातील अणसुर-पाल गावाच्या बाजूने खाडी वाहते. अणसुर-वरचीभाट येथील काही भाग हा बागायती व शेतीचा असून त्याला लागूनच ही खाडी आहे. या खाडीकडील भागात बागायती व शेतीच्या जमिनिची धुप होऊ नये यासाठी धुपप्रतिबंधक बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत होती. त्या मागणीनुसार सन २०१२ मध्ये या ठिकाणी दोन किलो मिटर लांबीच्या जागेत हा धुपप्रतिबंधक बंधारा मंजुर झाला होता. आणि त्या कामासाठी सुमारे ५४ लाख रुपये मंजुर झाले होते. त्यावेळी मंजुर झालेल्या या कामाला तात्काळ सुरुवात न होता ते काम तब्बल तीन वर्षांनी म्हणजेच सन २०१५ मध्ये करण्यात आले. मात्र प्रत्यक्ष कामाला सुुरुवात करण्यास विलंभ झाल्याने तीन वर्षातील वाढती महागाई व सर्वच साहित्याचे वाढलेले दर यामुळे हे काम करतानाही असलेला निधी हा केवळ एक किलो मिटरचा धुप प्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठीच खर्च झाला. परिणामी एक किलोमिटर बंधारा अद्याप झालेला नाही. त्यामुळे या एक किलोमिटरच्या भागात पावसाच्या वाढत्या पाण्यामुळे पुर आल्यानंतर सर्व खारे पाणी बागायती व शेतीमध्ये घुसले. यामध्ये चांगले उत्पन्न देणारी नारळाची झाडे (माड) कोसळून पडत आहेत. यामुळे सध्यस्थितीत ग्रामस्थांचे सुमारे ५० हजारांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. आपले नुकसान टाळण्यासाठी येथील बागायतदार व शेतकरी आनंद उर्फ बीटु गावडे यांनी त्या धुप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या जागेत आपल्या खर्चाने नारळाच्या झाडाची झापे टाकून तेथील उंची वाढविली आहे. मात्र असे केले असले तरी खारे पाणी बागायती व शेतीमध्ये घुसुन नुकसान होण्याचा दाट शक्यता आहे. या भागात माडाची झाले, भातशेती जमिन असून त्यातून शेतकऱ्यांना उत्पन मिळत आहे. त्यामुळे खारलँड विभागाने तात्काळ या भागाची पहाणी करुन सदर जागेवर धुपप्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी नवीन कामास मंजुरी द्यावी आणि पावसाळा संपताच हे काम पुर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

\