Wednesday, December 4, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावेंगुर्लेत गमक परिवार आणि माझा वेंगुर्ला यांचा पुढाकार

वेंगुर्लेत गमक परिवार आणि माझा वेंगुर्ला यांचा पुढाकार

सिंधुदुर्गातील अतिवृष्टी बाधित गरजू नागरिकांच्या मदतीसाठी नियोजन

वेंगुर्ले,ता,१४: कोल्हापूर-सांगली येथील पुरग्रस्थांसाठी वेंगुर्ले येथून रवाना होणाऱ्या मदत कार्यात गमक परिवाराने आपला खारीचा वाटा उचलला आहे. १२ ऑगस्ट पर्यंत जमा झालेले कपडे, शर्ट, पॅन्ट, साड्या, लहान मुलांचे कपडे, स्वेटर,चादरी आदींचे सॉर्टींग करून वस्तू सुपूर्त करण्यात आल्या. आता आपल्या जिल्हातील आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी गमक व माझा वेंगुर्ला यांनी मिळून नियोजन केले आहे.
अन्य भागप्रमाणेच आता आपल्या वेंगुर्ले तालुका आणि सिंधुदुर्गातील पुरबाधित बांधवांसाठी उभं राहण्याची वेळ आहे. आपल्या परिसरातील गरजा लक्षात घेऊन गमक परिवार आणि माझा वेंगुर्ला यांच्या वतीने खालील प्रमाणे नियोजन केले आहे. यामध्ये आपणही आपले बहुमोल असे योगदान द्यावे.
गुरुवार १५ ऑगस्ट व शुक्रवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते २ आणि संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत मारूती मंदिर स्टॉप, वेंगुर्ला येथे मदत स्वीकारली जाणार आहे. कुणीही तांदूळ, डाळ, तेल, साखर अशा जीवनावश्यक वस्तू देऊ शकता. या वस्तू प्रत्येक कुटुंबाला एकत्रित पॅकेट करून वितरित करण्याचे नियोजन आहे. त्याप्रमाणे आपण साहित्य एकत्रित करून आमच्याकडे जमा करू शकता. यामध्ये चादरी, ब्लॅंकेट , चटई, तात्पुरता निवारा म्हणून ताडपत्री इतर गृहोपयोगी वस्तू आदींचा समावेश आहे.जमा झालेली मदत त्वरित आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात गरजुना वितरित करण्याची व्यवस्था केली जाईल.
त्याचप्रमाणे सिंधुदुर्गात असे काही बांधव आहेत की ज्यांचे स्वतःच्या नावावर घर अगर ७/१२ वर नाव नाहि परंतु ते वर्षानुवर्षे त्या घरात राहत आहेत. त्यांनी या पुरस्थितीत आपला निवारा गमावला आहे, अशांना तांत्रिक अडचणीमुळे शासकीय मदत वेळेत मिळू शकणार नाही. त्यामुळे अशा आपल्या पुरबाधित बांधवाना आपण आधार देणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी आपण आर्थिक स्वरूपात मदत करावी असे आवाहन आहे.
३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत आपण रक्कम ऑनलाइन देखील जमा करू शकता. यासाठी अकाऊंट- माझा वेंगुर्ला – AC No.: *039100100002615*
IFSC Code: *SRCB0000039*
Bank name – saraswat bank ,vengurla branch
दरम्यान रक्कम जमा केल्यावर description मध्ये flood fund असे लिहून व्हाट्सअप्प किंवा मेसेज द्वारे ९४२३३०१३१० श्री. राजन गावडे या क्रमांकावर माहिती द्यावी.असे आवाहन गमक आणि माझा वेंगुर्ला च्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments