पुराच्या आपत्तीतून सावरणाऱ्या मणेरी गावावर पुन्हा दुःखाचा डोंगर…

2

एकाच कुटुंबातील चार जणांना विजेचा धक्का; माय-लेक जागीच ठार…

दोडामार्ग/सुमित दळवी ता.१४:  नुकत्याच घडलेल्या पुराच्या आपत्तीतून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असलेल्या मणेरी गावावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.पूर परिस्थितीत जीर्ण झालेल्या विद्युत तारा जमिनीवर कोसळल्याने त्यांना स्पर्श होऊन एकाच कुटुंबातील चार जणांना विजेचा धक्का बसला.यात गुरुदास काशीनाथ ( ४५ ) व शोभा काशीनाथ नाईक ( ६८) या माय-लेकाचा जागीच मृत्यु झाला.
मणेरी चाराचीवाडी येथे गेल्या दोन दिवसांपूर्वी विजेची तार तूटून पडली होती.त्या तारेला दोन दिवसांपूर्वी कुत्र्याचा स्पर्श होऊन मृत्यु झाला होता.त्या कुत्र्याची सर्वत्र दुर्गंधी पसरली होती.त्यासाठी त्या कुत्र्याची विल्हेवाट लावण्यासाठी शोभा या त्या कुत्र्याला काढण्यासाठी गेल्या दरम्यान त्यांचा त्या विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने त्या जागीच कोसळल्या.हे दृश्य पाहुन आईला वाचवण्यासाठी तिचा मुलगा गुरुदास हा धाऊन गेला असता त्यांना ही त्या विजेच्या तारेचा स्पर्श झाला व दोघांचा जागीच मृत्यु झाला.
ही घटना सर्वत्र गावात पसरताच सर्वानी धाव घेत त्या दोघांनाही येथील दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात आणले.ही घटना तालुक्यात कळताच तालुक्यातील सर्वानी दोडामार्ग रुग्णालयात धाव घेतली.

18

4