राजू कासकर:उपरकरांच्या जिवावर तालुकाप्रमुख झालेल्या राऊळांना टीका शोभत नाही…
सावंतवाडी ता.१४: परशुराम उपरकर यांच्या जिवावर तालुकाप्रमुख झालेल्या रुपेश राऊळ यांना त्यांच्यावर टीका करणे शोभत नाही.त्यांना इतकेच आपल्या नेत्याबद्दल प्रेम असेल तर उपरकर व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यात आमने-सामने करण्यात यावे.त्यावेळी त्यांना योग्य ते उत्तर देऊ,असा इशारा मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू कासकर यांनी आज येथे दिला.
उपरकर यांच्यावर टीका करण्यापेक्षा तुमच्या पालकमंत्र्यांनी गेल्या पाच वर्षात काय केले याचे उत्तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेला द्यावे,केवळ प्रसिद्धीसाठी टीका योग्य नाही.असेही यावेळी श्री.कासकर यांनी सांगितले.
रुपेश राऊळ यांनी काल याठिकाणी पत्रकार परिषद घेऊन मनसेचे नेते परशुराम उपरकर यांच्यावर टीका केली होती.याला कासकर यांनी पत्रकार परिषद घेवून प्रत्युत्तर दिले.यावेळी आशिष सुभेदार संकेत मयेकर अतुल केसरकर संतोष भैरवकर आदी उपस्थित होते.