वेंगुर्ला रोटरॅक्ट, इंटरॅक्ट व रोटॅकिडस् पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

2

वेंगुर्ले,ता,१४: रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या रोटरॅक्ट, इंटरॅक्ट व रोटॅकिडस् क्लबचा पदग्रहण सोहळा साईमंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे उत्साहात पार पडला.

रोटरॅक्ट प्रेसिडेंट हेमंत गावडे, सेक्रेटरी अभिषेक साळगावकर, ट्रेझरर अमेय पुनाळेकर व उर्वरित कार्यकरिणी यांना इंन्स्टॉलिंग ऑफिसर असिस्टंट गव्हर्नर रो. वसंत करंदीकर यांच्या हस्ते तसेच सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंटरॅक्ट प्रसिडेंट सानिका नेरुरकर, सेक्रेटरी आदित्यराज सावंत व उर्वरित कार्यकरिणीला इंन्स्टॉलिंग ऑफिसर आरडीसी तथा नगराध्यक्ष रो.दिलीप गिरप यांच्या हस्ते तर रोटॅकिडस्चा पदग्रहण सोहळा आरडीसी रो. संजय पुनाळेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. पदग्रहण सोहळ्याची सुरुवात सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंटरॅक्ट क्लबच्या ईशस्तवन, स्वागतगीत व फाल्गुनी नार्वेकरच्या गणेश वंदना बहारदार भरतनाट्यम नृत्याने झाली. यावेळी सिंधुदुर्ग रोटरी असिस्टंट गव्हर्नर रो. वसंत करंदीकर, नगराध्यक्ष तथा रोटरी डिस्ट्रिक्ट ऑफिसर रो. दिलीप गिरप, रो.संजय पुनाळेकर, रो.सचिन वालावलकर, रोटरी क्लब प्रेसिडेंट रो. राजेश घाटवळ, सेक्रेटरी रो.सुरेंद्र चव्हाण, रोटरी क्लब पदाधिकारी डॉ.आनंद बांदेकर, गणेश अंधारी, दादा साळगावकर, प्रशांत आपटे, सुनिल रेडकर, सुनिल नांदोसकर, प्रा.सदाशिव भेंडवडे, पंकज शिरसाट, इनरव्हिल प्रेसिडेंट वृंदा गवंडळकर, सिंधुदुर्ग विद्यानिकेतन हेडमिस्ट्रेस मनिषा डिसोझा, डॉ.पूजा कर्पे आदी मान्यवर तसेच इंटरॅक्ट क्लब खर्डेकर कॉलेज, पालकवर्ग यांच्या उपस्थितीत रोटरॅक्ट क्लब, इंटरॅक्ट क्लब सिंधुदुर्ग विद्यानिकेतन पदग्रहण सोहळा संपन्न झाला. मान्यवरांनी नुतन रोटरॅक्ट क्लब व इंटरॅक्ट क्लबला शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यात विविध उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रो. नितीन कुलकर्णी यांनी तर आभार रो.डॉ.वसंत पाटोळे यांनी मानले.

14

4