वेंगुर्ले.ता,१४: वेंगुर्ले शहरातील गांधी मिठाई दुकानाचे मालक सदानंद गिरप यांनी आपल्या दुकानासमोरील रस्त्यावर मिळालेले सोन्याचे मंगळसूत्र वेंगुर्ले पोलिसांच्या ताब्यात देवुन प्रामाणिकपणा दाखविला. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तालुका कार्यालयात त्यांचा पक्षातर्फे सत्कार करण्यात आला.
भाजपा तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नगराध्यक्ष राजन गिरप यांचे हस्ते सदानंद गीरप यांचा शाल , श्रीफळ व पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला . यावेळी तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , नगरसेवक सुहास गवंडळकर, नगरसेवक नागेश ऊर्फ पिंटू गावडे, नगरसेवक धर्मराज कांबळी, नगरसेविका श्रेया मयेकर, नगरसेविका साक्षी पेडणेकर, मच्छिमार नेते दादा केळुसकर, महिला शहर उपाध्यक्षा व्रुंदा गवंडळकर व प्रकाश धावडे इत्यादी उपस्थित होते.