पंचायत समिती सभापती सुनिल मोरजकर यांचे कृषी विभाला आदेश…
वेंगुर्ले ता.१४: तालुक्यात अतिवृष्टीतून आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या भात पिकाचा सर्व्हे करुन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश वेंगुर्ले प.स.सभापती सुनिल मोरजकर यांचे कृषी विभाला दिले आहेत.
माहे-ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे वेंगुर्ले तालुक्यात बऱ्याच ठीकाणी शेतीचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या भात पिकाचा तात्काळ सर्व्हे करणेत यावा. तसेच नुकसान ग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करणेत यावेत, असे आदेश वेंगुर्ले सभापती सुनिल मोरजकर यांनी तालुका कृषि अधिकारी यांना दिलेले आहेत. तसेच हे पंचनामे नुकसान भरपाई मिळण्यासाठी त्वरित शासनाकडे पाठवावेत असेही सांगितले आहे.