केळूस व वेंगुर्ले येथील पूरग्रस्तांसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वेंगुर्ला शाखेचा मदतीचा हात..

177
2
Google search engine
Google search engine

पूरग्रस्त १५ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप…

वेंगुर्ले.ता,१४: रौद्ररूप धारण करून कोसळलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूराचे पाणी वस्तीत घुसून जनजीवन विस्कळित झाले. पूरामुळे अनेक कुटुंबांचे नुकसान झाले. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वेंगुर्ला च्या पदाधिकाऱ्यांनी माणूसकिच्या नात्याने केळूस गावातील पूरग्रस्त १४ कुटुंबांची व वेंगुर्ले येथील एका कुटुंबाची भेट घेऊन तांदूळ, कडधान्य, तेल, डाळ, पोहे, साखर इ. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
सांमाजिक बांधिलकीतून वेंगुर्ला प्राथमिक शिक्षक संघाने केळूस व वेंगुर्ले येथील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीत खारीचा वाटा उचलला. यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वेंगुर्लाचे अध्यक्ष एकनाथ जानकर, माजी अध्यक्ष झिलू गोसावी, कर्पुरगौर जाधव, चंद्रकांत सावंत, समीर तेंडोलकर,रामचंद्र झोरे, विजय मस्के, मनोज बहिरम, संदिप कोकणी, मनाली कांबळी, दिप्ती कोचरेकर, वैदेही गोसावी, केळूसचे माजी सरपंच योगेश शेट्ये तसेच किशोर केळूसकर उपस्थित होते. मदत कार्यात हातभार लावणाऱ्या सर्व सदस्यांचे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वेंगुर्लेच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.