मनसेतर्फे कुडाळ येथे २३ रोजी भव्य रोजगार मेळावा…

378
2
Google search engine
Google search engine
Google search engine

परशुराम उपरकर;५ हजार नोकर्‍या उपलब्ध करून देणार…

कणकवली, ता.१४ : नोकरीच्या निमित्ताने सिंधुदुर्गातील अनेक तरुण मुंबई,पुणे येथे जातात.मात्र तेथे गेल्यानंतर नोकरी मिळेलच याची शाश्वती नसते.त्यामुळे सिंधुदुर्गातील तरुणांना मुंबई,पुणे,गोवा येथे नोकर्‍या उपलब्ध होण्यासाठी मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित महाराष्ट्र नवनिर्माणसेना पुरस्कृत भव्य रोजगार मेळावा शुक्रवार २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायं.५ वासुदेवानंद ट्रेड सेंटर उद्यमनगर कुडाळ येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यानी दिली.
मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत या भव्य रोजगार मेळाव्यामध्ये थेट मुलाखती व थेट भरती होणार असुन जवळपास ५००० नोकर्‍या उपलब्ध होणार असल्याचे सांगताना माजी आम.उपरकर म्हणाले, बेरोजगार युवक, युवतींना आपल्या आवडच्या क्षेत्रात नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने मनसेच्या माध्यमातुन उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
यावेळी मुंबई,पुणे,गोवा या भागातुन ३५ ते ४० कंपन्या उपस्थित राहणार असुन रोजगार मेळाव्यातुन मुलाखती घेऊन त्याना ऑफर लेटर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे त्यानंतर मुंबई,पुणे अथवा गोवा येथे सदर बेरोजगार तरुणाला नोकरीसाठी नियुक्त केले जाणार असुन दरमहा वेतन १० हजार ३०० ते २५ हजार पर्यंत शिक्षणानुसार उपलब्ध होणार आहे. पीएफ, ओव्हरटाईम, साप्ताहीक सुट्टी यासारख्या सुविधा बेरोजगार तरुणांना नोकरी सुरु झाल्यावर मिळणार असुन 5 वी ते पदवीधर यामध्ये एमबीए, अभियांत्रीकी याही शाखांचा समावेश असुन १८ ते ३५ वयोगटातील तरुणांना रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे. बायोडाटा ५ प्रती, पॅन कार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड, ५ पार्सपोर्ट साईज फोटो व शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स कॉपी घेऊन बेरोजगार तरुणांनी उपस्थित रहावे असे आवाहन परशुराम उपरकर यानी केले असुन बँकींग, फायनान्स, इन्शुरन्स, रिटेल, लॉजिस्टीक, ऑटोमोबाईल, बीपीओ, केपीओ, हॉस्पीटॅलिटी, सिक्युरीटी, टेलिकाँम, ईकॉमर्स, एफएम सीजी, व्हुमन रिर्सोसिस, एज्युकेशन, अ‍ॅडमिनीस्टेशन, अकौंटींग, ओव्हरसिज, आययटीआय ऑलट्रेड, सेल्सअ‍ॅन्ड मार्केटींग, बॅक ऑफीस, हाऊस किपींग, हॉटेलिंग, नर्सिंग, ड्रायव्हर, आयटी सेक्टर या क्षेत्रातील कंपन्या उपस्थित राहणार असुन बेरोजगारानी मनसे पदाधिकार्‍यांशी संपर्क साधावा असे आवाहन माजी आम.परशुराम उपरकर यानी केले आहे.

\