सिंधुदुर्गातील पुरग्रस्तांसाठी मनसेच्या माध्यमातुन दोन ट्रक साहीत्य उपलब्ध

137
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली.ता,१४: अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्गात पुरसदृश्यस्थिती निर्माण होऊन काही गावातील नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सिंधुदुर्गाश्रतील पुरग्रस्तांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातुन जीवनावश्यक साहीत्य त्याचप्रमाणे अन्य मदत उपलब्ध झाली असुन या साहीत्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यानी दिली.

कणकवली येथे मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातुन पुरग्रस्तांसाठी मदत उपलब्ध करण्यात आली आहे. हे साहीत्य सिंधुदुर्गात दाखल झाले असुन मनसे नेते नितीन सरदेसाई, सरचिटणीस संदीप देशपांडे, उपाध्यक्ष प्रवीण मर्गज, उपाध्यक्ष राजन शिरोडकर यांच्या उपस्थितीत पुरग्रस्तांना वितरीत करण्यात येणार आहे. मनसे विद्यार्थीसेनेचे पदाधिकारी सुमन तारी, संतोष मयेकर, प्रशांत बागवे, गणेश कदम व इतरांनी पुरग्रस्तांना मदतीसाठी प्रयत्न केले होते. पुरग्रस्तांसाठी 2 ट्रक साहीत्य उपलब्ध झाले असुन यामध्ये जीवनावश्यक वस्तुंबरोबरच चटई, चादरी, कपडे, फिनेल, त्याचप्रमाणे शैक्षणिक साहीत्य यांचा समावेश असुन आपदग्रस्तांचा आढावा आणि माहिती घेण्यात येत असुन आपदग्रस्तांना हे साहीत्य वाटप केले जाईल असे परशुराम उपरकर यानी सांगितले.

\