उत्पादन शुल्क विभागाची कुडाळ येथील कारवाई वादात…

226
2

तोड-पाणी झाल्याची चर्चा: कोणतीही नोंद नाही,वरिष्ठ अधिका-यांचे म्हणणे…

कुडाळ ता.१४: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने काल रात्री येथे केलेली कारवाई वादात सापडली आहे.दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह एका अधिकाऱ्याने आर्थिक सौदा करून दारूने भरलेली गाडी पास केल्याची खुद्द उत्पादन शुल्कच्या खात्यातच चर्चा आहे.या सर्व प्रकरणानंतर अधिकाऱ्यांचे दारू व्यावसायिकांशी साटेलोटे असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पथकाने कुडाळ येथील भंगसाळ नदीच्या पुलावर रात्री साडे नऊ वाजता ही गाडी पकडली होती.मात्र कारवाई न करता तोडपाणी करून ती गाडी सोडून देण्यात आली.या बाबत काही ग्रामस्थांनी सुध्दा दुजोरा दिला आहे.याबाबत आपल्याकडे काहीच दाखल नसल्याचे अधिका-यांकडुन सांगण्यात आले.

4