सावंतवाडीच्या स्मशानभुमीकडे जाणारे पूल खचले…

2

सावंतवाडी ता.१४: शहरातील स्मशानभूमी व क्रिश्चन वाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पूल खचल्याची घटना घडली आहे.हा प्रकार आज सकाळच्या सुमारास येथील काही नागरिकांच्या निदर्शनास आला.दरम्यान याबाबतची माहिती त्यांनी नगरपालिकेला दिली.त्यानुसार नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.व संबंधित पुलाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी तसेच तोपर्यंत हा मार्ग बंद ठेवावा असे आदेश दिले आहेत.घडली.त्यामुळे येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
या वेळी माजी नगरसेवक संजय पेडणेकर ,रेमी अल्मेडा उपस्थित होते.दरम्यान याबाबत श्री.साळगावकर यांनी माहिती दिली.ते म्हणाले हे पुल नव्याने मंजूर करण्यात आले आहे.त्याचे टेंडर झाले आहे.त्यामुळे आता तात्पुरती डागडुजी करून पावसाळ्यानंतर हे काम हातात घेण्यात येणार आहे.या पुलावरून जाणाऱ्या लोकांनी आपली काळजी घ्यावी असेही त्यांनी सांगितले
गेले काही दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे हा पूल खचला आहे त्यामुळे या ठिकाणाहून पायी तसेच वाहने घेऊन जाण्यास धोका निर्माण झाला आहे.तर हे पूल कोसळण्याची सुद्धा शक्यता आहे.त्यामुळे या रस्त्याने जाताना दक्षता घेणे गरजेचे आहे.या घटनेची माहिती येथील इंजिनीयर कृष्णा खोरागडे व सामाजिक कार्यकर्ते मयूर लाखे यांनी दिली.

19

4