हळदीचे नेरूर विद्यालयाच्या नुतनीकरण हॉलचे १८ ऑगस्टला उद्घाटन…

182
2
Google search engine
Google search engine
Google search engine

माणगाव.ता,१४: न्यु इंग्लिश स्कुल, कला, वाणिज्य महाविद्यालय हळदीचे नेरूरच्या हॉल नुतनीकरणचा उद्घाटन रविवार दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. संस्था अध्यक्ष बाळ सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.

विद्यालयाच्या हॉलचे नुतनीकरण माजी विद्यार्थी संघ, भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप, संस्था व ग्रामस्थ यांच्या संयुक्त योगदानातुन करण्यात आले आहे. या नुतनीकरण हॉलचे उद्घाटन रोटरी क्लब कुडाळचे डॉ. रविंद्र जोशी यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, उद्योजक महेश भोगटे, बांधकाम व्यवसायिक आनंद कांदळगांवकर, अन्नपुर्णा एंटरप्रायजेसचे योगेश नाडकर्णी, उद्योजक दयानंद सामंत, संस्था संस्थापक सचिव विश्राम दळवी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी विद्यार्थी संघ, पालक-शिक्षक संघ, शिक्षकेतर कर्मचारी वृदांच्या वतीने करण्यात आले आहे.

\