वेंगुर्लेत श्री चिंतामणी संगीत विद्यालयाचा गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात…

262
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले ता.१४: श्री चिंतामणी संगीत विद्यालयाच्या गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुअभिवादन सोहळा येथील साई मंगल कार्यालयात मोठ्या दिमाखात संपन्न झाला.या कार्यक्रम प्रसंगी संध्या मांजरेकर,अंबरीश मांजरेकर,भाई वेंगुर्लेकर,प्रमोद मुंडये,गोपीचंद बागुल,सुधीर मालवणकर,स्वप्नाली पेडणेकर,शिल्पा जोशी,प्रसाद धारे,विश्वनाथ मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सन २०१८-१९ या वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यात तेजस विजयानंद मेस्त्री,हेमंत गोपाळ तोरस्कर,प्रतीक बाळकृष्ण शेटकर,सुयोग जयराम कासकर तर नॅशनल कम्प्युटरिंग ओलंपियाड स्पर्धेमध्ये देशातून पंधरावा आलेला कुमार स्वयम् येरागी आणि सामाजिक कार्यकर्त्या संध्या मांजरेकर व अंबरीश मांजरेकर,तबला शिक्षक,प्रमोद मुडये,चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण कांदळकर यांचाही शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संचालक.निलेश पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांची यशस्वी वाटचाल आणि घेतलेले उपक्रम याबाबत सविस्तर माहिती दिली.प्रमुख पाहुणे संध्या मांजरेकर यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीबाबत कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाची सुरुवात तेजस मेस्त्री यांच्या सुमधुर गणेश वंदनाने झाली.त्यांना मनीष तांबोस्कर व सागर सावळ यांनी उत्तम साथ दिली.त्यानंतर विद्यार्थ्यांची एकूण ७९ विद्यार्थींनी बहरदार सोलो वादन सादर केले.छोट्या मुलांच्या तबला पखवाज जुगलबंदी कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरला.त्यानंतर गुरु व सर्व विद्यार्थ्यांनी आपले गुरु निलेश पेडणेकर यांना वंदन केले कार्यक्रमाच्या शेवटी तेजस मेस्त्री व सत्यनारायण कळंगुटकर यांच्या सुमधुर गाण्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी किरण म्हापणकर ,सुशांत खानोलकर तेजस गडेकर,महेश मुनंकर,सचिन नाईक,नम्रता पालव,नेहा पवार,सर्वेश तांडेल,हरि नाईक यांनी विशेष सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग परब व काका सावंत यांनी केले.

\