सावंतवाडी शहरात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी..

308
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.१४: शहरात दरवर्षीप्रमाणे नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रथेप्रमाणे राज घराण्याकडून देण्यात येणाऱ्या मानाच्या नारळाची संस्थानचे युवराज लखमराजे भोसले व पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या शुभहस्ते पूजा करून हा नारळ शेकडो सावंतवाडीकरांच्या उपस्थित तलावाला अर्पण करण्यात आला.
सावंतवाडी शहरात दरवर्षी नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.यावेळी येथील श्रीराम वाचन मंदिर परिसरातील मोती तलावाचा काठ नागरिकांच्या गर्दीने फुलून गेलेला असतो.दरम्यान याहीवर्षी तलावात नारळ अर्पण करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर,उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा,कोरगावकर नगरसेवक सुरेंद्र बांदेकर,उद्योजक राजन अंगणे,दिलीप भालेकर,सचिन इंगळे,अखिलेश कोरगावकर, आशिष सुभेदार आदींसह मोठ्या संख्येने सावंतवाडीकर उपस्थित होते.