सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे पुरस्कार जाहीर…

2

सतीश सावंत ;२१ ऑगस्ट रोजी शरद कृषी भवनात वितरण…

सिंधुदुर्गनगरी ता.१४:  जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्याच्या विकासात योगदान देणाऱया व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कार देण्याची आदर्श परंपरा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने कायम ठेवले आहे. सहकार, कृषी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या पाच जणांना पुरस्कार जाहीर झाले असल्याची माहिती बुधवारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी सिंधुदुर्नगगरी येथील पत्रकार परिषदेत केली. या पुरस्काराचे वितरण २१ रोजी शरद कृषी भवन येथे होणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी, भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर , कृषी तज्ज्ञ सचिन सावंत, आणि गाडगीळ अशा समितीने जिल्हय़ात ठिकठिकाणी भेटी देऊन जिल्हा बँकेच्या या पुरस्कार विजेत्यांची निवड केली होती. या पुरस्कार समितीच्या उपस्थितीत सतीश सावंत यांनी पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, प्रमोद गावडे आधी अधिकारीही उपस्थित होते. सन २०१६ पासून जिल्ह्यात सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा जिल्हा बँकेमार्फत गौरव करण्याची परंपरा सुरू करण्यात आली होती. या वर्षी या बँकेचे हे पुरस्कार जाहीर करताना आपल्याला आनंद होतो अशा शब्दात सतीश सावंत यांनी प्रतिकिया व्यक्त केली.
स्वर्गीय बाळासाहेब सावंत यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार रायगड, अलिबाग येथील अप्पासाहेब धर्माधिकारी यांना, कै शिवरामभाऊ जाधव स्मृती प्रित्यथ् उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार कॅथाॅलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि सावंतवाडी यांना, कै डी बी ढोलम स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट सहकारी कर्मचारी पुरस्कार तळवडे वि. का. स. से.सो. लिमिटेड संतोष यशवंत राऊळ यांना, कै केशव रावजी राणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार देवगड अर्बन को.ऑ.बॅक अध्यक्ष दिलीप धोंडूशेट आचरेकर उर्फ भाई आचरेकर यांना, तर कै भाईसाहेब सावंत स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा कृषीमित्र पुरस्कार असरोंडी येथील विजय कालीदास सावंत यांना जाहीर झाला आहे.

21 ऑगस्ट रोजी सत्कार सोहळा
जिल्हा बँकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पुरस्काराचे वितरण 21 ऑगस्ट रोजी शरद कृषी भवन येथे होणार आहे. पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा शाल, श्रीफल, सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली…

4