Monday, April 21, 2025
Google search engine
HomeUncategorizedआपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी साडे चौदा कोटी...

आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी साडे चौदा कोटी…

दिपक केसरकर;सर्व प्रकारच्या नुकसानीची मदत मिळणार…

सिंधुदुर्गनगरी ता.१४: जिल्ह्यात नुकत्याच उद्भवलेल्या आपत्तीने खराब झालेले रस्ते सुस्थितित करण्यासाठी ८ कोटी ३१ लाख रूपये तर आपत्कालीन यंत्रणा सक्षम करण्यासाठी ६ कोटी रूपये जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर करण्यात येत आहे.तसेच या आपत्तीत १० हजार हेक्टर शेती, ३४ पाणी पुरवठा योजना बाद झाल्या, ११०० कुटुंबे बाधित झाली असून यावेळी नुकसानी झालेल्या सर्व प्रकारच्या बाबींना आर्थिक मदत देण्यात येणार आहे,अशी माहिती देतानाच बुधवारी झालेल्या जिल्हा नियोजन समिती सभेत ही आपत्ती जिल्ह्यातील सर्वच व्यक्तींनी एकत्र येवून निवारुया असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
जिल्हा नियोजनच्या नवीन सभागृहात केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे, खा. विनायक राऊत, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, आ नितेश राणे, आ वैभव नाईक, आ अनिकेत तटकरे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांच्यासह बहुसंख्य सदस्य व अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments