स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ५८ महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्रसेनेच्यावतीने काढली मशाल फेरी…

2

फेरीत सहभागी होत आमदार वैभव नाईक यांनी सर्वांना दिल्या शुभेच्छा…

मालवण, ता. १४ : येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या ५८ महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्रसेना विभागाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘सन्मान देशभक्तचा व मशाल फेरी’ या आयोजित कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय एकतेची मशालफेरी काढण्यात आली. या मशाल फेरीस आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित सर्व छात्रसेनेचे विद्यार्थी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व शहरातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देऊन मशाल फेरीमध्ये सहभाग घेतला.
या मशाल फेरीमध्ये सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत, शिवसेना तालुकाप्रमुख तथा जि. प. सदस्य हरी खोबरेकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे आदी पदाधिकारी, शहरातील नागरिक व महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

22

4