कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना पंधरा हजार रुपयांचा धनादेश सुपुर्द
वैभववाडी ता.१६ तालुका शिक्षण संस्था संचलित अर्जुन रावराणे विद्यालय व कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयामार्फत कोल्हापूर सांगली येथील पूरग्रस्तांसाठी निधी म्हणून संस्थेने पंधरा हजार रुपये रकमेचा धनादेश वैभववाडी तहसीलदार श्री. रामदास झळके यांच्याकडे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे स्थानिक अध्यक्ष श्री. जयेंद्र रावराणे यांनी सुपूर्द केला.
यावेळी सभापती लक्ष्मण रावराणे, नगराध्यक्षा सौ. दिपा गजोबार उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, वैभववाडी पोलीस उपनिरीक्षक श्री. शेणवी, मुख्याध्यापक श्री. बी. एस. नादकर, श्री. एस. बी. शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.