पदाधिका-यांच्या हस्ते लोकार्पण:आणखीन गाड्या लवकरच खरेदी करणार…
सावंतवाडी ता.१६: डीपीआर प्लाननुसार उपलब्ध झालेल्या निधीतून सावंतवाडी शहरासाठी दोन कचरागाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत.या गाड्यांचे लोकार्पण आज पालिका पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.दरम्यान डीपीआर प्लान मधून सुमारे दोन कोटी ४३ लाख रुपयांचा निधी सावंतवाडी पालिकेला शासनाकडून देण्यात आला आहे.त्याअंतर्गत वजन काटे,स्वच्छतेसाठी गाड्या,कचऱ्यावर प्रक्रिया मशीन अशा वस्तू खरेदी करण्यात येणार आहेत.
तसेच खरेदी करण्यात आलेल्या दोन गाड्यांच्या माध्यमातून शहरातील कचरा जमा करण्यात येणार आहे.सद्यस्थितीत आठ गाड्या कचरा जमा करण्याचे काम करत आहेत.आता यात दोन गाड्या वाढल्यामुळे कचरा लवकरात लवकर जमा करणे शक्य होणार आहे.त्यामुळे लवकर काम झाल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना या गाड्या अन्य ठिकाणी वापरता येणार आहे.असे यावेळी साळगावकर यांनी सांगितले.
यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर,मुख्याधिकारी संतोष जिरगे,नगरसेवक सुरेंद्र बांदेकर,आनंद नेवगी,बाबू कुडतरकर,राजू बेग,मनोज नाईक,भारती मोरे,शुभांगी सुकी,दिपाली भालेकर,दिपाली सावंत,माधुरी वाडकर,मयू पटेकर,अभय पंडीत,आसावरी शिरोडकर,परविन शेख,भाऊ भिसे आदी उपस्थित होते.